ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिकच्या गंगापूर रोडवरील डीके नगर पोलीस चौकीत रात्री अकराच्या सुमारास 5 पोलीस ओली पार्टी करताना आढळून आले. पोलीस चौकीतच बार मांडून पोलिसांची ओली पार्टी रंगली होती. हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्यावेळी संतापलेल्या पोलिसांनी व्हिडिओ बनवणाऱ्याला मारहाण केली. दरम्यान, या घटनेनेमुळे नाशिक पोलिसांच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली.
गंगापूर रोड परिसरात प्रेमी युगुलांचे चाळे सुरू असल्याने त्यासंबधी तक्रार देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रात्री अकराच्या सुमारास डीके नगर पोलीस चौकी गाठली. तर तिथे पोलीसच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालताना आढळून आले. पोलिसांनी चौकीतच बार मांडला होता. हा सगळा प्रकार एका नागरिकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्यावेळी पोलिसांनी शुटींग करणाऱ्या नागरिकाला मारहाण केली. पोलिसांच्या या डर्टी पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने. आता या दारूडय़ा पोलिसांवर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.