म्हासुर्ली/प्रतिनिधी
धामणी खोऱ्यातील चौके पैकी मांडवकरवाडी (ता.राधानगरी) येथे मुंबई वरून गावाकडे आलेल्या पण सध्या प्राथमिक शाळेत संस्थात्मक अलगिकरण कक्षात असलेल्या पन्नास वर्षीय पुरुषाचा स्वॅब रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. सलग दुसऱ्या दिवशी चौके परिसरातील रुग्ण सापडल्याने कोरोना व्हॉरसची छाया अधिकच गडद होत चालली असून धामणी खोऱ्यातील सलग तिसऱ्या दिवशी ही कोरोना रुग्ण सापडल्याने एकूण रुग्ण संख्या १४ वर पोहचली आहे. सदर रुग्णास सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी राधानगरी येथील कोविड सेंटर मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.