चौके – प्रतिनिधी-
साळेल- नांगरभाट गावचे सुपुत्र, चौके बाजारपेठेल प्रसिध्द महेश ट्रेडिंग कंपनीचे सर्वोसर्वा ,बांधकाम व्यावसायिक, गणपत शांताराम तावडे ऊर्फ बाळा तावडे (५४) गावातील लहान थोरांचे दादा यांचे मंगळवारी सकाळी खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, बहिण, भाओजी, पुतणे असा मोठा परिवारअसून अचानक निधनाने साळेल गावासह चौके पंचक्रौशीवर शोककळा पसरली.