वेन एफ्लेकसोबत करतेय रोमांस
52 वर्षीय हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझने आतापर्यंत 3 विवाह केले आहेत. तिचे हे तिन्ही विवाह फारकाळ टिकू शकलेले नाहीत. पण जेनिफर आता चौथ्या विवाहाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. जेनिफर स्वतःच्या प्रियकरासोबत विवाहाच्या बंधनात अडकू शकते. ‘बॅटमॅन’फेम हॉलिवूड अभिनेता बेन एफ्लेकसोबत जेनिफरचे सध्या अफेयर सुरू आहे.
हॅप्पिली एव्हर आफ्टर
जेनिफर लोपेझ सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘मॅरी मी’चे प्रमोशन करत आहे. एका शोमध्ये तिला विवाहाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मी अत्यंत रोमँटिक व्यक्ती आहे हे तुम्ही जाणताच. यापूर्वीही मी अनेकदा विवाह केला आहे. आता देखील मी पूर्णपणे ‘हॅप्पिली एव्हर आफ्टर’मध्ये विश्वास ठेवते असे तिने उत्तर दिले आहे. जेनिफर आणि बेन मागील महिन्यात ‘द लास्ट डय़ूलट’च्या प्रीमियरप्रसंगी एकत्र दिसून आले होते.
जेनिफरने 1997 मध्ये पहिला विवाह ओजानी नोआसोबत केला होता. हा विवाह केवळ एक वर्षे टिकला. त्यानंतर 2001 मध्ये तिने क्रिस जुडशी संसार थाटला पण तो दोन वर्षेच चालू शकला. मग 2004 साली तिने मार्क अँथोनीसोबत विवाह केला, 10 वर्षांच्या संसारानंतर दोघेही विभक्त झाले.
जेनिफर आणि बेन यापूर्वीही परस्परांसोबत प्रेमाच्या नात्यात राहिले आहेत. दोघेही 2002 साली प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांची एंगेजमेंटही झाली होती. पण 2004 साली त्यांचे बिनसले होते.