वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून विविध कंपन्यांचे तिमाहीतील नफा कमाईचे अहवाल नकारात्मक आले आहेत. फेब्रुवारीत तर येस बँकेच्या प्रकरणामुळे ग्राहकांचा खासगी बँकांवरील विश्वास डळमळीत झाला होता. परंतु एचडीएफसी बँकेने नफा कमाईत वाढीची नोंद केली आहे. चौथ्या तिमाहीत बँकेने व्याजातील उत्पन्नात वर्षाच्या आधारावर 16.5 टक्क्मयांनी वधार नोंदवत 15204.06 कोटी रुपयाच्या घरात पाहोचला आहे. याचा परिणाम म्हणून बँकिंग क्षेत्रासाठी ही बाब दिलासादायक राहणार असल्याचे म्हटले जात आहे. चौथ्या तिमाहीत(जानेवारी ते मार्च) या कालावधीत बँकेचा नफा वार्षिक आधारावर 17.72 टक्क्मयांनी वधारुन 6,927.69 कोटी रुपयावर पोहोचला असल्याचे सांगितले आहे.
सरासरी कोरोनाच्या संकटामुळं चौथ्या तिमाहीतील अहवालानुसार हा नफा कमाईचा अंदाज मांडला आहे. याचे कारण म्हणजे व्यवसायात मोठी तेजी पहावयास मिळाला आहे. याच कालावधीत बँकेतील गुंतवणूक 24.2 टक्क्मयांनी वर्षाच्या पातळीवर वधारली आहे. तर 7.4 टक्क्मयांची वाढही तिमाहीच्या दरम्यान नेंदवत 11,46,500 कोटी रुपयाच्या घरात गुंतवणूक पोहोचली आहे. एनपीएमध्ये मात्र घसरण झाली आहे. 16 बेसिस पाँईटची घसरण होत 1.26 टक्क्मयांवर राहिली आहे. तर नेट एनपीए12 बेसिस पाँईटची घसरण नोंदवत 0.36 टक्क्मयांवर राहिली आहे.