वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात अडथळा ठरलेले गावमळा व कुरधुंडा सिमेवरील भेल्याचे झाड जैसे थे आहे. दोन वर्षे झाली तरी अजुनही झाड आहे तसेच आहे. आजुबाजुची झाडे तुटली तरी अजुनही हे झाड तोडण्यासाठी कोणी येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गावमळा ग्रामस्थांचे श्रध्दा स्थान असलेले व 80 वर्षाचे जुने असे भेल्याचे झाड चौपदरीकरणात अडथळा बनले आहे. संगमेश्वर ते बावनदी पर्यत चौपदरीकरणात अडथळा ठरलेली झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सन 2018 ला दोन गावाच्या सिमेवरील झाड तोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने हे झाड तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते झाड हटलेच नाही. तसेच जेसीबी बंद पडल्याने ते काम थांबविण्यात आले. गेले अनेक दिवस झाड तोडण्याचा प्रयत्न परंतू त्याचा उपयोग झालेला नाही.
त्यासाठी गावकऱयांनी देवाला गाऱहाने घातले आहेत तरीही हे झाड तुटले नाही. याबाबत चौपदरीकरणाचे काम करणाऱया ठेकेदाराने हात झटकले असून हे काम माझे नसून स्थानिक लाकूड ठेकेदाराला हे काम दिलेले असल्याने त्याने भेल्याचे झाड हटवावे असे सांगितले होते. सन 2018 झालेल्या या घटनेनंतरही हा भेला जैसा थे आहे. त्या भेलाविषयी अजुनही महामार्गावरुन जाणारे कौतूकाने पहातात.