जागतिक बाजार घसरलाः गुंतवणूकदारांना 4.5 लाख कोटीचा फटका
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स 1,159 अंकांनी कोसळला आहे. यामध्ये प्रामुख्याने जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणाच्या दरम्यान महिन्याचा अन्य व्यवहार संपविण्याच्या घाईगडबडीत गुंतवणूकदारांकडून चौफेर विक्रीच्या प्रभावामुळे भारतीय बाजार मोठय़ा घसरणीत राहिला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
ट्रेडिंगच्या दरम्यान संपूर्ण दिवसभरात 61081 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला असून 59,777.58 अंकांपर्यंत काहीशी घसरण झाली आहे. बाजारात 1300 अंकांपेक्षा अधिकची घसरण नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी बाजारात दिवसअखेर 1,158.63 अंकांपेक्षा अधिकने घसरुन सेन्सेक्स निर्देशांक 59,984.70 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 353.70 अंकांसह घसरुन निर्देशांक 17,857.25 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या समभागांपैकी आयटीसीचे समभाग सर्वाधिक 5 टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, ऍक्सिस बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेन्ट्सचे समभाग लाभात राहिले होते.
चढउताराच्या प्रवासात प्रमुख ट्रेडिंगमधील आर्थिक आणि आयटी कंपन्यांमध्ये तीव्र घसरणीसोबत देशातील बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना जवळपास 4.5 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.शुक्रवार आठवडय़ातील बाजाराचा अंतिम दिवस असल्यामुळे भारतीय बाजारात कोणता कल राहणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि नवीन महिना सुरु होणार असल्याने गुंतवणूकदार कोणती भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार असल्याचे अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक. 1175
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1817
- अल्ट्राटेक सिमेंट 7441
- एशियन पेन्ट्स 3126
- मारुती सुझुकी 7373
- बजाज फायनान्स 7485
- Ý अंबुजा सिमेंट.. 390
- एसीसी…….. 2289
- बंधन बँक……. 298
- अपोलो हॉस्पिटल 4293
- बायोकॉन……. 337
समभाग घसरलेल्या कंपन्या
- आयटीसी……. 225
- आयसीआयसीआय 798
- कोटक महिंद्रा 2098
- ऍक्सिस बँक…. 757
- टायटन…….. 2369
- स्टेट बँक……… 501
- एचडीएफसी बँक 1592
- एनटीपीसी….. 137
- टेक महिंद्रा… 1532
- सन फार्मा…… 807
- बजाज ऑटो.. 3700
- एचसीएल टेक 1532
- टाटा स्टील… 1299
- भारती एअरटेल 688
- पॉवरग्रिड कॉर्प 186
- टीसीएस…… 3424
- डॉ.रेड्डीज लॅब 4573
- इन्फोसिस…. 1704
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2599
- एचडीएफसी. 2900
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 882
- नेस्ले………. 18940
- हिंदुस्थान युनि 2390
- बजाज फिनसर्व्ह 17977
- अदानी एन्टरप्राईजेस 1392
- अदानी पोर्ट…. 688
- कोल इंडिया…. 166
- पॉवर फायनान्स 134
- अरोबिंदो फार्मा 679
- पिरामल एन्टर 2584
- सिप्ला 891