ऑनलाईन टीम / छत्तीसगड :
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा जंगल परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आज सकाळी 9.30 च्या सुमारास चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी 201 बटालियन कोबरा, 223 बटालियन सीआरपीएफ आणि जिल्हा राखीव दलाच्या जवानांची जगरगुंडा जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान, जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना शोधमोहिमेची खबर लागताच त्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास जवानांना यश आले.
नक्षलवाद्यांकडील मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जवानांनी जप्त केला आहे. पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.