ऑनलाईन टीम / दुर्ग :
छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी सर्वेश्वर धुरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
त्यांनी या आदेशात म्हटले आहे की, दुर्ग जिल्ह्यातील कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेत 6 ते 14 एप्रिल दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
पुढे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. त्यांनी नागरिकांना सांगितले की, कोणीही घराबाहेर पडू नये. घरातच सर्वांनी सुरक्षित राहावे. तसेच सद्य परिस्थितीत लॉकडाऊन लावणे गरजेचे होते. कारण या निर्णयामुळेच ही स्थिती आटोक्यात येईल.
तसेच यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.