ऑनलाईन टीम / छत्तीसगड
छत्तीसगढ राज्यातील बिजापूर येथे तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली असून या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहे, तर दहा जवान जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी दिली आहे.
बिजापूर येथील तारेम येथे ही चकमक झाली असुन नक्षलविरोधी अभियानात सहभागी 400 जवान आणि पोलीस तारेम पोलीस ठाण्याकडे जात असताना सिलगेरच्या वन्य क्षेत्रात नक्षलवाद्यांनी या तुकडीवर हल्ला चढवला, यावेळी झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. तर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी 9 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असुन जखमी जवानांनसाठी घटनास्थळी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्याचा मास्टरमाइंड हिडमा सिलगेर गावचा रहिवासी झीरम हा नक्षलवादी असल्याचं सांगितलं जात आहे.