ऑनलाईन टीम / रायपूर :
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. इतर राज्य देखील आपापल्या पद्धतीने कोरोनापासून बचावासाठी उपाययोजना करत आहेत. देशात कोरोना संशयितांना 14 दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येते. मात्र, छत्तीसगढ सरकारने आता कोरोना संशयितांना 28 दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता छत्तीसगढमध्ये कोरोना संशयितांना 14 नाही तर 28 दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. सुकमा जिल्ह्यात तेलंगणाहून आलेल्या गावकऱ्यांना 28 दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी 100 बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. कोरोनाने आतापर्यंत छत्तीसगढमध्ये 6 बळी घेतले आहेत.