डिचोली/प्रतिनिधी
डिचोली येथील शांतादुर्गा हायस्कुलसमोरील सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या चौथऱयाला एका राज्याबाहेरील अवजड वाहनाची धडक बसल्याने सदर चौथऱयाच्या पायथ्याची मोडतोड झाली. सदर प्रकरण नंतर परस्परपणे सामंजस्यपणाने मिटविण्यात आले व सदर चौथऱयाच्या दुरूस्तीची हमी सदर वाहनमालकाकडून घेण्यात आली.
सदर घटना काल सोम. दि. 26 ऑक्टो. रोजी संध्याकाळी घडली. काल सकाळीच या सर्कलमध्ये बसविण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलचे उदघाटन करण्यात आले होते. सध्या सदर वाहतूक सिग्नल प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येत असले तरी डिचोली बायपास रस्त्यावरून आलेल्या एमएच 18 ए ए 8671 हे अवजड वाहन वाहतूक सिग्नलचा नियम पाळत सर्कलजवळ आले. व म्हापसाच्या दिशेने जाण्यासाठी वळण घेत असताना डिचोली शहरातून (साकवावरून) सिग्नल तोडून आलेल्या एका स्कुटरचालकामुळे अवजड वाहनाने सदर स्कुटरचालकाला वाचविण्यासाठी वाहन आत मारून घेतले. त्यावेळी सदर वाहनाचे उजव्या बाजूचे मागील चाक पुतळय़ाच्या चौथऱयाच्या पायथ्याला लागले. आणि सदर चौथऱयाची मोडतोड झाली.
सदर प्रकरण नंतर वाहनमालक व डिचोलीतील शिवप्रेमी यांच्यात सामंज्यसपणाने मिटविण्यात आले. मोडतोड झालेल्या चौथऱयाची दुरूस्ती करण्याची हमी वाहनमालकाकडून देण्यात आल्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले. त्यानुसार तत्काळ या चौथऱयाची दुरूस्ती केली जाणार आहे.
डिचोली तालुक्मयात प्रथमच बसविण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलचे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांच्या हस्ते सभापती राजेश पाटणेकर व इतरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले होते. सध्या सदर वाहतूक सिग्नल प्रायोगिक तत्वावर चालू ठेवण्यात आले असून अचानकपणे सुरू झालेली या सिग्नल पध्दती डिचोलीतील वाहनचालकांसाठी काहीसे अवघड बनच आहे. मात्र काही दिवस गेल्यानंतर लोकांनाही सदर वाहतूक सिग्नल पध्दतीची सवय होणार. व वाहतूक व्यवस्था सुरळीत चालणार यात शंकाच नाही.
मात्र काल घडलेल्या अपघात घटनेत सदर अवघड वाहन डिचोलीतील वाहनचालकांच्या वाहतूक सिग्नलबाबतीत काही प्रमाणात असलेल्या अजाणतेपणाचा फटका बसला. कारण बायपास रस्त्यावरून म्हापसाच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावरील सिग्नल जाण्यासाठी खुले असल्याने सदर अवजड वाहन चालकाने सदर वाहतूक सिग्नलचा नियम पाळत गाडी थेट हाकली. परंतु शहरातून बोर्डेच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर वाहने थांबविण्याचे सिग्नल असतानाही एक दुचाकीचालक सिग्नल तोडून सरळ आल्याने त्या अवजड वाहनचालकाला गाडी आत मारून घ्यावी लागली. आणि त्यामुळे गाडीची मागील चाके पुतळय़ाच्या चौथऱयाच्या पायथ्याला लागल्याने त्याची मोडतोड झाली. त्यामुळे या वाहतूक सिग्नल्सची सवय स्थानिकांना सवय होणे गरजेचे आहे.