प्रतिनिधी /पणजी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, मुष्टीफंड हायस्?कूल, कुजिरा येथील श्री. अनिकेत सुशांत भाटीकर इयत्ता 8वी यांनी संगणक प्रणालीच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर आधारित सुंदर खेळ(उaस) विकसित केला आहे. या खेळाचे नाव त्यांनी “छत्रपती द वॉरियर” असे ठेवले आहे. हा खेळ स्क्र?च (sम्ratम्प्) सॉफ्टवेअर वापरून तयार करण्यात आला आहे. स्क्र?च सॉफ्टवेअर हे नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्?ता 6वी, 7वी आणि 8वी संगणक अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या ब्लॉक आधारित प्रोग्रामिंगचा भाग आहे.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापिका सौ. अपर्णा चारी व उपमुख्याध्यापिका बिना शंखवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक शिक्षक श्री. मयूर मनोहर दळवी व सौ. प्रणिता सावंत यांच्या पुढाकाराने बनविण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ह्या खेळाचे प्रकाशन करून लोकार्पण करण्यात येईल.
संगणक शिक्षक श्री. मयूर मनोहर दळवी यांनी आपले विचार मांडताना म्हटले की हा खेळ फक्त मनोरंजनात्मक नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच जीवनपट खेळाच्या वेगवेगळय़ा टप्यांवर येत राहील. उदाहरणार्थ ः शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणागड जिंकला होता. असे विविध पॉपअप्स खेळ खेळता येतील.
अभिमान वाटावा असा आपला इतिहास आहे. या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये असलेली इतिहासाची आवड अजून वृध्द?िगत होईल आणि इतिहास विषयापासून दूर राहणाऱया मुलांना इतिहास आवडू लागेल.
या खेळाद्वारे काही ठळक ऐतिहासिक घटना व प्रसंग मुलांसमोर येतील.इतिहास घडवणाराच्या मांडावळीत आपलेही नाव असावे अशी सुप्त भावना मनात जागृत करण्यासाठी हा खेळ एक माध्यम बनेल.