शिवसेना उपशहरप्रमुख गणेश अहिवळे यांचे प्रखट मत
प्रतिनिधी/ सातारा
मराठय़ांची राजधानी असलेल्या साताऱयातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहलायाची नवीन वास्तू सुसज्ज अशी आहे. त्याच इमारतीत हे संग्रहालय सुरु व्हावे. अशी मनोमन इच्छा आम्हा शिवभक्तांची आहे. जिल्हाधिकाऱयांनी लवकरात लवकर नव्या इमारतीचे हस्तांतरण करावे जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संग्रहालयाला चांगले दिवस येतील. महसूल विभागाकडून जी दिरंगाई होत आहे. त्याबाबत आम्ही नाराज आहोत, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे उपशहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज संग्राहालयात सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून जागतिक वारसा सप्ताह व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलता गणेश अहिवळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाजल्य असा इतिहास आजच्या तरुणांना गरजेचा आहे. तो इतिहास समजून घ्यायचा असेल तर साताऱयाच्या संग्रहालयाला आर्वजून भेट दिली पाहिजे. संग्रहालयामध्ये असणाऱया ऐतिहासिक वस्तू त्या काळात झालेल्या लढाया, त्या काळात झालेल्या घटनांमध्ये घेवून जातो. आज हे संग्रहालय स्वतःची इमारत असूनही भाडय़ाच्या खोलीत भरते आहे ही खेदाची बाब आहे. महिन्याकाठी सहा हजार रुपये भाडे शासनालाच भरावे लागते आणि स्वतःची नवीन इमारत ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात आहे. कोरोनाच्या काळात ही इमारत वापरली तेव्हा आम्हा शिवभक्तांचा विरोध नव्हता. परंतु आता कोरोना कमी झाला असून जंबो रिकामे आहे. तर जिल्हाधिकाऱयांनी ती इमारत संग्रहालयाकडे हस्तांतरीत करावी, असे मत व्यक्त केले. महारुद्र तिकुंडे यांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना प्रवीण शिंदे म्हणाले, सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. 23 रोजी सातारा शहर व परिसरात इतिहासतज्ञांचे चर्चा सत्र, दि. 24 रोजी बामणोलीचे वनक्षेत्रपाल हसबनीस,दुर्गनाद ट्रेकर्सचे गणेश शिंदे, अश्वमेघ निसर्ग मित्र ग्रुप यांच्यावतीने वासोटा किल्ला स्वच्छता अभियान, दि. 26 रोजी शिवप्रेमी व सामाजिक संघटना यांच्यावतीने किल्ले अजिंक्यतारा येथे स्वच्छता अभियान व किल्ले संवर्धन चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कर्मचाऱयांनी प्रयत्न केले.