उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली मंजूरी
मुंबई / प्रतिनिधी
पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यामधील वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंजूरी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक कर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला साजेसे असावे, या स्मारकामुळे संभाजी महाराजांचा गौरव झाला पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धा आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. यासाठी स्थानिकांशी चर्चा, आणि विचारविनिमय करुन त्यांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक (ता. हवेली, जि. पुणे) येथील स्मारकाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते