मुंबई
सोनी मराठी वाहिनीवर दररोज रात्री 8.30 वा. प्रसारित होणाऱया ‘छोटय़ा बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेचे चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्हय़ात देवगड तालुक्मयातील वाडा आणि पुरळ या गावी सुरू आहे. या मालिकेमध्ये शेठ म. ग हायस्कूल देवगडच्या शौरिन देसाई आणि अनुष्का पोकळे या बालकलाकारांना महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
सिंधुदुर्गातील अनेक स्थानिक कलाकारही या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर प्रथमच छोटय़ा पडद्यावर काम करत आहेत. नेरुर-कुडाळच्या रुची नेरुरकर हिने बयोची भूमिका साकारली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या बयोचे डॉक्टर व्हायचे स्वप्न असते. असंख्य संकटांचा सामना करत बयोची आईही तिचे स्वप्न साकार करण्यासाठी काबाडकष्ट करत असते. अशी ही कथा पुढे सरकत आहे. कोंकण अर्थात सिंधुदुर्गची पार्श्वभूमी असल्यामुळे यातील काही संवाद मालवणी भाषेत आहेत. विक्रम गायकवाड, शशांक दरणे, संजय मालंडकर, संतोष रेडकर, निकुंज शिवलकर, लीना पाटकर, दीपज्योती नाईक, कल्पना सारंग, नम्रता पावसकर, सुप्रिया
प्रभुमिराशी, प्रणिता साळुंखे असे अनेक नामवंत कलाकारही विविध भूमिका साकारत आहेत.
तळेबाजार-देवगडमधील शौरिन देसाई हा आरवच्या भूमिकेमध्ये तर अनुष्का पोकळे ही इराच्या भूमिकेमध्ये झळकली आहे. शौरिन देसाईने आजपर्यंत गायनाच्या विविध स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळविले आहे तर शौरिन आणि अनुष्का या दोघांनाही राज्यस्तरीय बालनाटय़ स्पर्धेमध्ये अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे.
जीत बोडिंगे हे या मालिकेचे पटकथा लेखक असून, सुनील हरिश्चंद्र हे संवाद लेखक, निर्माते शैला काणेकर, संतोष काणेकर, दिग्दर्शक जालिंदर कुंभार, नरेश नलावडे, छायाचित्रकार हरिश सावंत, प्रमुख निर्मिती व्यवस्थापक मिलिंद दांडेकर, कार्यकारी निर्माता विपुल सोनावणे आहेत. ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.