केजी 2 च्या विद्यार्थिनीच्या नावावर 9 विश्वविक्रम
केजी-2 ची विद्यार्थिनी महालक्ष्मी आनंद हिने 9 विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. तिचे वडिल आनंद कुमार हे इंजिनियर आहेत. तिच्या आईचे नाव नीना आनंद आहे. महालक्ष्मीने तीन शेणींमध्ये हे विक्रम नोंदविले आहेत. एका मिनिटात सर्वाधिक इन्व्हेंटर्स आणि इन्व्हेंशन्सची नावे तिने सांगितली आहेत. या कामगिरीसाठी महालक्ष्मीचे नाव इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स, इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्ड्स, ब्रिटिश वर्ल्ड रिकॉर्ड्स आणि कलाम्स वर्ल्ड रिकॉर्ड्स फॉर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रेस्पिंग पॉवर ज्युनियर किड म्हणून नोंदले गेले आहे. तिने 54 सेकंदांमध्ये सर्वाधिक भरतनाटय़मच्या मुद्रा आणि भावाभिव्यक्तीवर सर्वात वेगवान परफॉर्म करण्याचा विक्रमही स्वतःच्या नावावर केला आहे.
महालक्ष्मीने 26 सेकंदांमध्ये भारतातील राज्ये आणि राजधान्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये उच्चारण्याचा विक्रमही नोंदविले आहे. या मुलीच्या पालकांनी तिची प्रतिभा ती दीड वर्षांची असतानाच ओळखली होती.
महालक्ष्मी दीड वर्षांची असताना तिला वैज्ञानिक आणि नव्या संशोधनांची नावे शिकविण्यास प्रारंभ केला होता. तिला जे काही शिकवायची ते तिला आठवायचे. महालक्ष्मीने इंटरनेटवरून स्वतःच्या अनेक प्रश्नांची उतरे शोधण्याचा आणि विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचे तिची आई नीना यांनी सांगितले आहे.