प्रतिनिधी / सातारा
श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी केली साताऱ्यातील ऐतिहासिक गोलबाग विकास कामाची पाहणी, येथील राजवाडा समोर असलेली ऐतिहासिक गोलबाग ही सन 1869 मध्ये बांधण्यात आली होती.
याबागेत सुंदर असे रंगीत कारंजे असून याच ठिकाणी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा असून महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी 15 ऑगस्ट 1957 रोजी याचे उद्घाटन केले होते. सध्या या बागेचा नूतनीकरनाचे काम सुरु आहे, या वेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, बाळा राक्षे ,जितेंद्र निकम,इर्शाद भाई बागवान इर्यादी आणि नागरिक उपस्थित होते.