प्रतिनिधी/ बेळगाव :
लॉकडाऊनच्या काळात गावठी दारू थोपविण्यासाठी अबकारी व पोलीस विभागाने व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी बेळगाव तालुक्मयातील जंगल परिसरातील गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकून गावठी दारुसाठा नष्ट करण्यात आले.
अबकारी निरीक्षक लिंगराज, मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी बेळगाव तालुक्मयात हुल्ल्यानूर, बुड्रय़ानूर, कारावी, करवीनकुप्पी आदी गावातील जंगल परिसरात थाटण्यात आलेल्या गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकले आहेत.
काही घरांवरही छापा टाकून दारुसाठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत सुमारे 50 हजारहून अधिक रुपये किमतीचा दारुसाठा नष्ट करून गुळाचे रसायन जप्त करण्यात आले आहे. कारावी येथील डोंगराळ भागात तर मोठय़ा प्रमाणात गावठी दारुचे अड्डे आहेत. यापूर्वी स्वतः तत्कालिन अबकारी मंत्री रेणुकाचार्य यांनी छापा टाकला होता.
पोलीस व अबकारी अधिकाऱयांवर दगडफेक करणाऱयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. अशा अड्डय़ांवर गुरुवारी पोलीस व अबकारी विभागाने संयुक्त मोहीम राबवून मोठय़ा प्रमाणात गावठी दारू व रसायन नष्ट केले आहे.