पालिकेने परवानगी दिल्याचे हातगाडीवाल्याचे म्हणणे
प्रतिनिधी/ सातारा
येथील मुख्य बसस्थानकाला लागूनच जंबो हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे.त्या हॉस्पिटलच्या बाजूनेच जाणाया रस्त्यालगत गेल्या दोन दिवसात एक चहाची आणि एक वडापावची टपरी लागली आहे.या टपरीचे चालक वाहतूक शाखेच्या कर्मचायांना सरळ सांगत आहेत की पालिकेने टपरी टाकायला परवानगी दिली आहे.दरम्यान, वाहतूक शाखेने सक्त सूचना दिल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या दोन्ही टप्रया हलवण्यात याव्यात असे त्यांनी फर्मावले आहे.
शहर व परिसरात अतिक्रमण मोठय़ा प्रमाणावर आहेत.ही अतिक्रमण काढली की लगेच होत असतात.आता ही शहरात कोरोनाच्या काळानंतर अन लॉक सुरू झाल्यानंतर वाढू लागली आहे.जंबो हॉस्पिटल परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी वाढू नये म्हणून वाहतूक शाखेने बांधकाम विभागाच्या सहकार्याने ठीक ठिकाणी बोर्ड लावले.वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी तेथील रिक्षा थांबा ही अन्य ठिकाणी हलवला.मात्र,गेल्या दोन दिवसात दोन हात गाडय़ा लागल्या गेल्या.त्यांना वाहतूक विभागाने विनंती केली असता पालिकेने गाडी लावण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून एवढे पालिकेत कोण आहे की अतिक्रमण करायला सांगते याचीच पालिकेत चर्चा सुरू आहे.