जगजंपी बजाजचे मल्लिकार्जुन जगजंपी यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
जगजंपीतर्फे शहरापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या साडेचार एकरात जगजंपी हॅप्पी होमची संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत 155 फ्लॅट उभारून 50 ते 60 वयोगटातील जोडप्यांना राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी साडेपंधरा लाख रुपयात विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. अशी माहिती जगजंपी बजाजचे मालक मल्लिकार्जुन जगजंपी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जगजंपी हॅप्पी होमच्या बांधकामाला प्रारंभ झाला असून पुढील दोन वर्षांत काम पूर्ण होईल, या हॅप्पी होममध्ये राहणाऱया जोडप्यांना नाष्टा, जेवण, योग, प्रार्थना, स्विमिंग पूल, वॉकिंग ट्रकची सुविधादेखील पुरविली जाणार आहे. या सर्व देखभालीसाठी 25 जणांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. या फ्लॅटचे 26 जानेवारीपासून बुकिंग सुरू होणार असून 1 हजार अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यापैकी 155 जणांची निवड केली जाणार आहे.
याबरोबरच मुलगी निवेदिता हिचा येत्या 5 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत बजाज दुचाकी खरेदीवर 5 हजार कॅश डिस्काऊंट दिली जाणार आहे. या योजनेचा दुचाकी खरेदीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील जगजंपी यांनी केले आहे.