प्रतिनिधी/ पणजी
सांतआंदेचे समाज सेवक तसेच 2017 विधानसभा निवडणूकीचे सांतआंदेचे मगोचे उमेदवार जगदीश भोबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काल गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. गोवा फॉरवर्डचे सवेसर्वा विजय सरदेसाई यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन पक्षात प्रवेश दिला. यावेळी गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर, जयेश साळगावकर तसेच दुर्गादास कामत उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे सांतआंद्रे मतदारसंघात सामाजिक कार्य करत आहे. पण सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाचा आधार मिळाला तर चांगले यामुळे 2017 मध्ये मगो पक्षात प्रवेश केला. पण मगो पक्ष हा महाराष्ट्रवादी असल्याने अनेक कार्यकर्ते &नाराज झाले होते. गोवा फॉरवर्ड पक्ष हा स्थानिक व गोव्याचा हितासाठी जोपासणारे आहे. तसेच या पक्षाचे मुख्य कार्यालयही गोव्यात आहे. तसेच या पक्षाचे नेते चांगले कार्य करत असल्याने या पक्षात प्रवेश केला आहे, असे यावेळी जगदीश भोबे यांनी सांगितले.
सांतआंद्रेचा विकास करणार
गेली अनेक वर्षे सांतआंदे मतदार संघाचा विकास झालेला नाही हा मतदार संघ पोरका झाला आहे. त्यामुळे आम्ही या मतदार संघाच्या विकासासाठी जगदिश भोबे sयांना गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश दिला आहे. फ्रान्सिस सिल्वेरा हे भाजपमध्ये स्वःताच्या फायद्यासाठी गेले होते. पण त्यांची आता या पक्षात घुसमट होत आहे. या मतदारसंघात मरिना प्रकल्प तसेच नावशी कुरका येथे प्रकल्पाला लोकांचा विरोधात आहे त्यांच्या या समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या लोकांना आज नोकऱया नाही अनेक बेरोजगार आहे त्यांचे प्रश्न सोडविले जाणार आहे, असे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनीं सांगितले.
भाजप सरकार हे आता लोकायुक्तांचा अहवालही मानत नाही लोकायुक्ताकडून खाण घोटाळय़ा प्रश्नी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य जणावर ठपका ठेवला असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंद करावी. अशी मागणी विजय सरदेसाई &यांनी केली. लोकायुक्ताच्या अहवालाच्या आधारे कर्नाटकामधील भाजप सरकारने भाजपचे येडीयुराप्पा यांच्यावर कारवाई करुन त्यांना पदावरुन हटविले होते. पण गोव्यात अशी कारवाई करताना दिसत नाही. 27 अमादार असल्याने ते आपल्याला हवे ते निर्णय घेत आहे येणाऱया अधिवेशनला आम्ही सरकाराला अनेक विषयावर घेरणार आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.