शिकागो
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळामध्ये आयफेल टॉवरचा आवर्जून उल्लेख केलेला पाहायला मिळतो. गेले कित्येक महिने बंदी असणारा आयफेल टॉवर आता सर्वांसाठी खुला करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे तमाम पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीची भूमिका म्हणून गेले 9 महिने आयफेल टॉवरला भेट देण्यास पर्यटक व नागरिकांना निर्बंध लादण्यात आले होते. अखेर शुक्रवारपासून सरकारने हे निर्बंध मागे घेतले आहेत. डेल्टा व्हेरीयंटच्या वाढत्या प्रभावाखातर सरकारने पॅरीस शहरातील मुख्य आकर्षण असणाऱया आयफेल टॉवरच्या भेटीवर निर्बंध लादले होते. आता टॉवरचा परिसर खुला झाला असला तरी कोरोना लसीकरणाचा पास येथे येणाऱयांना दाखवावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 18 वर्षावरील ज्यांनी कोरोना टेस्ट केली आहे किंवा कोरोना झाल्यानंतर नेगेटीव्ह टेस्ट आली आहे अशांनाच आयफेल टॉवर व परिसरातील हॉटेल व इतर मनोरंजन ठिकाणांना भेट देता येणार आहे.