ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबळींची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जगभरात आतापर्यंत 5 कोटी 30 लाख 92 हजार 605 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 12 लाख 99 हजार 409 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 3 कोटी 72 लाख 13 हजार 411 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 1 कोटी 45 लाख 79 हजार 785 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 95 हजार 725 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 73 हजार 936 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 48 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 87 लाख 28 हजार 785 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 28 हजार 886 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 57 लाख 83 हजार 647 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 64 हजार 332 जण दगावले आहेत.