ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबळींची संख्या 25 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जगभरात आतापर्यंत 11 कोटी 27 लाख 51 हजार 495 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 24 लाख 98 हजार 630 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 8 कोटी 83 लाख 21 हजार 032 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 2 कोटी 19 लाख 31 हजार 833 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 92 हजार 216 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 88 लाख 97 हजार 718 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 5 लाख 14 हजार 996 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 1 कोटी 10 लाख 30 हजार 176 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 56 हजार 598 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 1 कोटी 02 लाख 60 हजार 621 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 48 हजार 646 जण दगावले आहेत.