ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 69 लाख 74 हजार 721 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 02 हजार 094 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 34 लाख 11 हजार 281 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 31 लाख 61 हजार 346 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 53 हजार 586 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 19 लाख 88 हजार 544 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 12 हजार 096 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 6 लाख 76 हजार 694 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 36 हजार 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये मृतांचा आकडा जास्त आहे. इंग्लंडमध्ये 2 लाख 84 हजार 868 कोरोना रुग्ण असून, 40 हजार 465 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलपाठोपाठ इटलीत मृतांची संख्या वाढत आहे. इटलीत आतापर्यंत 2 लाख 34 हजार 801 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 33 हजार 846 जण दगावले आहेत. भारतातही 2 लाख 46 हजार 622 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 6946 रुग्ण दगावले आहेत. 1 लाख 18 हजार 695 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 1 लाख 20 हजार 981 ॲक्टिव्ह केसेस आहेत.