ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबळींची संख्या 6 लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 42 लाख 08 हजार 149 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 5 लाख 99 हजार 750 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 84 लाख 82 हजार 915 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 51 लाख 26 हजार 483 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 59 हजार 732 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 37 लाख 70 हजार 138 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 20 लाख 48 हजार 697 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 77 हजार 932 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. इंग्लंडमध्ये 2 लाख 93 हजार 239 रुग्ण आढळले असून, 45 हजार 233 जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोत 3 लाख 31 हजार 298 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 38 हजार 310 जण दगावले आहेत.