ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7.77 लाखांवर गेली आहे. जगभरात आतापर्यंत 2 कोटी 20 लाख 49 हजार 426 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 7 लाख 77 हजार 439 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1 कोटी 47 लाख 91 हजार 859 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 64 लाख 80 हजार 128 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 62 हजार 074 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 56 लाख 12 हजार 027 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 73 हजार 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 33 लाख 63 हजार 235 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 08 हजार 654 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलनंतर मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. मेक्सिकोत 5 लाख 25 हजार 733 रुग्ण आढळले असून, 57 हजार 023 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात 27 लाख 01 हजार 604 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 51 हजार 925 जण दगावले आहेत.