ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबळींच्या संख्येने 80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात आतापर्यंत 80 लाख 13 हजार 919 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 35 हजार 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगभरातील 80.13 लाख बाधितांपैकी 41 लाख 37 हजार 545 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 34 लाख 40 हजार 386 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 54 हजार 461 केसेस गंभीर आहेत.
सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 21 लाख 62 हजार 228 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 17 हजार 858 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 8 लाख 67 हजार 882 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 43 हजार 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. रशियात 5 लाख 37 हजार 210 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7 हजार 091 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.