ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 5 कोटी 02 लाख 78 हजार 660 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 12 लाख 56 हजार 558 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 5 लाख 98 हजार 160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 7446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 5.02 लाख बाधितांपैकी 3 कोटी 55 लाख 56 हजार 538 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 34 लाख 65 हजार 564 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 91 हजार 801 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 82 हजार 977 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 64 लाख 41 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 43 हजार 257 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 85 लाख 07 हजार 754 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 78 लाख 68 हजार 968 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 26 हजार 162 जणांचा मृत्यू झाला आहे.