ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 16 कोटी 97 लाख 17 हजार 040 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 15 कोटी 15 लाख 93 हजार 125 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 5 लाख 37 हजार 622 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 11 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 1 कोटी 45 लाख 96 हजार 786 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 93 हजार 728 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाने आतापर्यंत जगात 35 लाख 27 हजार 129 रुग्णांचा बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत 3 कोटी 39 लाख 99 हजार 680 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 77 लाख 01 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 6 लाख 07 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.