ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 10 कोटी 83 लाख 04 हजार 103 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 8 कोटी 05 लाख 02 हजार 738 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 4 लाख 37 हजार 575 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 13 हजार 029 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 2 कोटी 54 लाख 22 हजार 358 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 99 हजार 948 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाने आतापर्यंत जगात 23 लाख 79 हजार 007 जणांचा बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत 2 कोटी 80 लाख 02 हजार 240 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 79 लाख 30 हजार 819 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 लाख 86 हजार 922 जणांचा मृत्यू झाला आहे.