ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात थैमान घालणाऱया कोरोना विषाणूने आतापर्यंत 30 हजार 882 जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत 195 देशांतील 6 लाख 64 हजार 071 जणांना याची बाध झाली आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश आपापल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. तिथे 1 लाख 23 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2227 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त म्हणजेच 10 हजार 23 जण दगावले आहेत, तर 92 हजार 472 जणांना याची बाधा झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा फैलाव काहीसा कमी झाला होता. मात्र, बरे झालेल्या 10 टक्के कोरोनाग्रस्तांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने चीनमधील चिंता वाढली आहे.
भारतातही 987 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 24 जण दगावले आहेत. तर 84 जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.