ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 7 कोटी 52 लाख 82 हजार 798 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 16 लाख 68 हजार 356 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 7 लाख 21 हजार 756 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 12 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 7.52 कोटी बाधितांपैकी 5 कोटी 28 लाख 52 हजार 602 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 07 लाख 61 हजार 840 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 07 हजार 205 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, अमेरिकेत 1 कोटी 76 लाख 26 हजार 707 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 02 लाख 91 हजार 027 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 17 हजार 928 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 99 लाख 79 हजार 447 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 95 लाख 20 हजार 827 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 44 हजार 829 जणांचा मृत्यू झाला आहे.