ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 6 कोटी 55 लाख 36 हजार 023 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 15 लाख 11 हजार 915 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 4 कोटी 53 लाख 75 हजार 993 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 1 कोटी 86 लाख 48 हजार 115 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 1 लाख 06 हजार 499 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 35 हजार 196 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 82 हजार 829 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 95 लाख 71 हजार 780 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 39 हजार 227 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 64 लाख 87 हजार 516 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 75 हजार 307 जण दगावले आहेत.