ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाने 11 लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. जगात 3 कोटी 91 लाख 69 हजार 824 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 11 लाख 02 हजार 919 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2 कोटी 93 लाख 78 हजार 268 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 86 लाख 88 हजार 637 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 70 हजार 902 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 82 लाख 16 हजार 315 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 22 हजार 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 73 लाख 65 हजार 509 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 12 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 51 लाख 70 हजार 996 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 52 हजार 513 जण दगावले आहेत.