ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 7 कोटी 70 लाख 20 हजार 317 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 15 लाख 88 हजार 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 6 लाख 78 हजार 684 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 12 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 7.70 कोटी बाधितांपैकी 4 कोटी 91 लाख 48 हजार 338 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 99 लाख 83 हजार 542 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 06 हजार 672 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत 1 कोटी 60 लाख 39 हजार 393 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 93 लाख 30 हजार 865 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 99 हजार 692 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात 97 लाख 96 हजार 992 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 92 लाख 90 हजार 834 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 42 हजार 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.