नवी दिल्ली : जगभरामध्ये बिटकॉईनसारखी प्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता दिवसागणित वाढत आहे. यासोबतच क्रिप्टो एटीएमची संख्याही त्याच वेगाने वाढत असल्याची माहिती आहे.
यामध्ये जगभरात 27,095 बिटकॉईन एटीएम आहेत. भारतामध्येही बिटकॉईनची गुंतवणुकीची संख्या तेजीने वाढली आहे. परंतु देशात एकही बिटकॉईन एटीएम उपलब्ध नाही आहे. देशात पहिले क्रिप्टो एटीएम 2018 मध्ये सुरु केले होते. तेही एक आठवडय़ानंतर बंद करण्यात आल्याची माहिती आहे. जगात सर्वाधिक बिटकॉईन एटीएम उत्तर अमेरिकेत व कॅनडात 25,000 पेक्षा अधिक बिटकॉईन एटीएम आहेत.