ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 2 कोटी 28 लाख 85 हजार 368 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 55 लाख 34 हजार 674 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी जगभरात 2 लाख 67 हजार 351 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 6186 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 7 लाख 97 हजार 473 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 65 लाख 53 हजार 221 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 845 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 57 लाख 46 हजार 534 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 30 लाख 95 हजार 910 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 77 हजार 426 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 35 लाख 05 हजार 097 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 26 लाख 53 हजार 407 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 12 हजार 423 जणांचा मृत्यू झाला आहे.