ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी देखील या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. जगभरात आतापर्यंत 33 लाख 08 हजार 044 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांपैकी 10 लाख 39 हजार 195 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असला तरी देखील 97 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जगभरात आतापर्यंत 33 लाख 08 हजार 044 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांपैकी 2 लाख 34 हजार रुग्ण दगावले आहेत. तर 10 लाख 39 हजार 195 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
अजूनही जगात 20 लाख 34 हजार 749 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 50 हजार 944 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.