ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची आतापर्यंत 16 लाख 99 हजार 583 जणांना बाधा झाली आहे. तर 1 लाख 2 हजार 734 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 लाख 76 हजार 325 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.जगभरातील 195 देशांमधील ही आकडेवारी आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश आपापल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 5 लाख 02 हजार 876 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 18 हजार 747 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त म्हणजेच 18 हजार 849 जण दगावले आहेत, तर 1 लाख 47 हजार 577 जणांना याची बाधा झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा फैलाव काहीसा कमी झाला आहे.
भारतातही 7600 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 249 जण दगावले आहेत. तर 774 जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 6577 ऍक्टिव्ह केसेस आहेत.