ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 41 हजार 729 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 51 लाख 45 हजार 067 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी जगभरात 2 लाख 87 हजार 906 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 10 लाख 12 हजार 657 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 76 लाख 84 हजार 005 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 65 हजार 977 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 74 लाख 06 हजार 146 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 46 लाख 48 हजार 683 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 10 हजार 785 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 62 लाख 23 हजार 519 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 51 लाख 84 हजार 634 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 97 हजार 529 जणांचा मृत्यू झाला आहे.