ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 51 लाख 03 हजार 350 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 20 लाख 34 हजार 226 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मागील 24 तासात जगभरात 1 लाख 474 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 3 लाख 29 हजार 239 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 27 लाख 33 हजार 293 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 45 हजार 800 केसेस गंभीर आहेत.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 15 लाख 93 हजार 039 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 94 हजार 941 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रशियामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रशियात 3 लाख 17 हजार 554 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 3 हजार 099 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये मृतांचा आकडा जास्त आहे. इंग्लंडमध्ये 2 लाख 48 हजार 293 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 35 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.