ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात मागील 24 तासात 6 लाख 13 हजार 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 10 हजार 818 रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांची एकूण संख्या 6 कोटी 19 लाख 88 हजार 071 वर पोहचली असून, मृतांचा एकूण आकडा 14 लाख 49 हजार 114 एवढा आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
6.19 कोटी बाधितांपैकी 4 कोटी 27 लाख 88 हजार 667 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 77 लाख 50 हजार 290 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 05 हजार 248 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 54 हजार 254 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 79 लाख 45 हजार 582 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 71 हजार 026 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 93 लाख 51 हजार 224 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 87 लाख 59 हजार 969 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 36 हजार 238 जणांचा मृत्यू झाला आहे.