ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 7 कोटी 21 लाख 97 हजार 899 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 5 कोटी 05 लाख 78 हजार 374 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शनिवारी जगभरात 6 लाख 38 हजार 030 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 10 हजार 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 2 कोटी 06 हजार 124 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 06 हजार 844 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाने आतापर्यंत जगात 16 लाख 13 हजार 401 जणांचा बळी घेतला आहे.
अमेरिकेत 1 कोटी 65 लाख 49 हजार 366 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 96 लाख 44 हजार 325 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 05 हजार 082 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात 98 लाख 57 हजार 380 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 93 लाख 57 हजार 564 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 43 हजार 055 जणांचा मृत्यू झाला आहे.