ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात 1 कोटी 15 लाख 84 हजार 874 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 65 लाख 52 हजार 292 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी जगभरात 1 लाख 75 हजार 499 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 3572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 5 लाख 36 हजार 445 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 44 लाख 82 हजार 990 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 58 हजार 538 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 29 लाख 83 हजार 155 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 12 लाख 89 हजार 687 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 32 हजार 571 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 16 लाख 04 हजार 585 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 9 लाख 78 हजार 616 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 64 हजार 900 जणांचा मृत्यू झाला आहे.