ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त करत जगातील प्रत्येक 10 वी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
WHO च्या आप्तकालीन विभाग प्रमुख डॉ. मायकल रियान म्हणाल्या, जगातील बहुतांश लोक कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. जगात आतापर्यंत झालेल्या कोरोना रुग्णांची नोंद आणि प्रत्यक्षात कोरोना आकडेवारीमध्ये 20 टक्क्यांचा फरक असल्याचा आमचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात प्रत्येक 10 व्यक्तींमागे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतो. कोरोना संक्रमण रोखण्याचे आणि रुग्णांचे जीव वाचवण्याचे उपाय उपलब्ध असल्याने आपण अनेक जीव वाचवले आहेत.
आग्नेय आशिया, युरोप आणि पश्चिम भू मध्य सागराच्या परिसरातील देशांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्या तुलनेने आफ्रिका आणि पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला असलेल्या देशांची स्थिती सकारात्मक आहे, असेही त्या म्हणाल्या.