जगात एकापेक्षा एक अवघड परीक्षा आहेत. पण मास्टर सोमॅलियर डिप्लोमा एक्झाम या शेणीत पहिल्या क्रमांकावर आहे. 4 टप्प्यांमध्ये होणाऱया या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात उमेदवाराला मद्याचा वास घेत ती कुठली असून आणि किती वर्षांपूर्वी तयार झाली हे सांगावे लागते. या परीक्षेत बसणारे बहुतांश उमेदवार अनुत्तीर्ण होतात.
कधी सुरू झाली परीक्षा
1977 मध्ये मद्यप्रेमींनी मिळून एक संस्था तयार करत कोर्ट ऑफ मास्टर सौमॅलियर (सीएमएस) हे नाव दिले. मद्याची मजा वाढेल अशाप्रकारचे मिश्रण तयार करणारा तरबेज निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता. कुठल्या प्रकारच्या मद्यासोबत कुठला खाद्यपदार्थ सर्वात चांगला ठरणार याचेही प्रशिक्षण यात देण्यात येते.
सोमॅलियर
सोमॅलियर ही संज्ञा वाइन प्रोफेशनलला देण्यात आली आहे. अत्यंत महागडी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये वाइन प्रोफेशनल्स असतात, जे ग्राहकांना उत्तम म्दयाचे मिश्रण उपब्लध करतात. तसेच कुठल्या वाईनसोबत काय खाणे योग्य ठरणार हेही ते जाणतात. याला वाइन अँड फूड पेयरिंग म्हणतात. सोमॅलियरचे पद ग्रँड शेफच्या तोडीचे असते.
कशी असते परीक्षा
4 टप्प्यांमध्ये याची परीक्षा असते, पहिल्या टप्प्यात इंट्रोडक्टरी होती, यात रेस्टॉरंट क्षेत्रातील काही वर्षांचा अनुभव असलेला कुठलाही व्यक्ती सामील होऊ शकतो. याकरता दोन दिवसांचे शिक्षण देण्यात येते, त्यानंतर बहुपर्यायी परीक्षा होते. यात मद्यनिर्मिती, द्राक्षे आणि सफरचंदाचे प्रकार, मद्य आणि खाण्याच्या पेयरिंगविषयी प्रश्न असतात.
दुसरा टप्पा
या टप्प्यात सर्टिफाइड सोमॅलियरसाठी परीक्षा असते. या परीक्षेतही अनेक भाग आहेत. यात लेखी परीक्षेसह डोळय़ांवर पट्टी बांधून मद्याचा वास घेत त्याचा स्वादत, त्याच्या निर्मितीचा काळ, कुठल्या द्राक्षाने तयार झाला आणि कोणत्या रंगाची आहे हे सर्व सांगावे लागते.
ऍडव्हान्स सोमॅलियर
अमेरिकेत वर्षात दोनदा ही परीक्षा होते. युरोपमध्ये ही परीक्षा 5 दिवसांपर्यंत चालते. लेखी परीक्षेत 60 प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर वाइन टेस्टिंग होते. यात डोळय़ांवर पट्टीसह 25 मिनिटांत 6 प्रकारच्या वाइनविषयी विविध गोष्टी सांगाव्या लागतात.
अंतिम टप्पा
तिन्ही टप्प्यात उत्तीर्ण झालेलेच यात सामील होऊ शकतात. याचबरोबर हॉटेल इंडस्ट्रीचा किमान 10 वर्षे अनुभव असावा लागतो. तसेच यात सहभागी होण्यासाठी स्वतःहून अर्ज भरता येत नाही. तर संबंधितांच्या वरिष्ठांनी शिफारस केली तरच यात सामील होता येते.