प्राण्याला पाहून तुमच्या चेहऱयावर हास्य उमटेल
जगातील सर्वात मोठा, छोटा, क्यूट आणि धोकादायक प्राण्यांबद्दल नक्कीच ऐकले असेल. पण नेहमी आनंदी राहणाऱया प्राण्याबद्दल माहिती आहे का? पृथ्वीवर एक असा प्राणी देखील आहे जो सदैव आनंदी राहतो. त्याला जगातील सर्वात आनंदी प्राणी मानले जाते.
या प्राण्याचा चेहरा नेहमीच हसरा दिसून येतो. या प्राण्याकडे पाहिल्यास तो हसत असल्याचे वाटते. त्याच्या चेहऱयाची ठेवणच तो आनंदाने हसत असल्याचे वाटावे अशी आहे. या प्राण्याचे नाव क्वॉका असून तो पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दलदलयुक्त भाग आणि जंगलांमध्ये आढळतो. याचे हास्य अत्यंत मनमोहन आहे. उंदरासारखा दिसणारा हा प्राणी एका मांजराइतका मोठा असतो. हा प्राणी मार्सुपियल्स श्रेणीतील असून तो कांगारूप्रमाणे पोटावरील पिशवीत स्वतःचे पिल्लू ठेवतो.
क्वॉका नावाचा हा क्यूट प्राणी ऑस्ट्रेलियात येणाऱया पर्यटकांदरम्यान अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच त्यांना सेल्फी काढून घेणे अत्यंत पसंत आहे. हा प्राणी सर्वसाधारणपणे समुहात राहणे पसंत करतो आणि रात्रीच बाहेर पडतो. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम हिस्स्यातील दलदलयुक्त भागात हा प्राणी आढळून येतो. याचबरोबर रॉटनेस्ट बेटावरही त्यांची मोठी संख्या आहे.