5 लाख रुपये आहे किमंत
जगातील अनेक लोकांना बंदुकींचा छंद असतो. काही लोक सुरक्षेकरता बंदूक बाळगतात तर काही जण केवळ शौक म्हणून स्वतःसोबत बंदूक ठेवतात. जगात अशी एक बंदुक आहे जी तळहातावरही सामावू शकते. या रिव्हॉल्व्हरची किंमत ऐकून तुम्ही दंग व्हाल.
स्विस मिन गन जगातील सर्वात छोटी रिव्हॉल्व्हर आहे. या बंदुकीचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे. ही बंदूक 5.5 सेंटीमीटर आकाराची आहे. तर 3.5 सेंटीमीटर उंचीची तर 1 सेंटीमीटर रुंदीची आहे. याचे वजन केवळ 19.8 ग्रॅम आहे. ही बंदूक लपविणे अत्यंत सोपे असल्याने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये याच्या आयातीवरही बंदी आहे. आकाराने अत्यंत लहान असली तरीही यात अन्य मोठय़ा बंदुकीप्रमाणेच सर्व वैशिष्टय़े आहेत. बंदूक तयार करण्यासाठी स्वीस वॉचमेकिंग आणि ज्वेलरी उद्योगात वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानाचा अवलंब होतो.
रिव्हॉल्वहरच्या सी1एसीटी स्टेनलेस स्टील मॉडेलसोबत एक स्टायलिश लेदर होल्डरही मिळते. तसेच 24 लाइव्ह आणि 24 ब्लँक कार्ट्रेज देखील दिले जातात. बंदुकीला की-रिंगच्या मदतीने बेल्टमध्येही अडकविले जाऊ शकते. या बंदुकीची किंमत 5 लाख रुपयांहून अधिक आहे. एवढेच नाही तर बंदुकीची एक गोल्ड व्हर्जन देखील उपलब्ध आहे. या बंदुकीने कुणाचाही जीव घेतला जाऊ शकतो असा अनेकांचा दावा आहे.